बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर महानगर परिवहन महामंडळ (बीएमटीसी) या वर्षी ऑक्टोबरपर्यंत बेंगळूररूमध्ये ९० इलेक्ट्रिक बसेस सुरू करणार आहे, असे बीएमटीसीचे अध्यक्ष एन. एस. नंदेशा रेड्डी यांनी सांगितले.
“नम्मा मेट्रो शहरात नेणाऱ्यांच्या पहिल्या आणि शेवटच्या मैलाच्या कनेक्टिव्हिटीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी या बस वापरल्या जातील,” असे सांगितले आहे.
बीएमटीसी, स्मार्ट सिटी प्रकल्पासह, बेंगळूर आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड या बसेस लाँच करत आहेत. या प्रकल्पात १३० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.