ऑनलाईन टीम / पुणे :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टडीज आणि डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझम या दोन विभागांचे विलीनीकरण करीत डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन, जर्नलिझम अँड मीडिया स्टडीज, असा नवीन विभाग प्रस्तावित करण्यात आला होता. त्यामुळे ऐतिहासिक रानडे इन्स्टिटय़ूटचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. दोन विभागांच्या विलीनीकरण करण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाला माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी मोठा विरोध केला. यासाठी सेव्ह रानडे इन्स्टिटय़ूट नावाची मोहीम देखील चालवली गेली होती. यानंतर अखेर शनिवारी रानडे इन्स्टिटय़ूटच्या स्थलांतराला स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत पुणे विद्यापीठाने पत्रक जारी केले आहे.
रानडे इन्स्टिटय़ूटची ईमारत विद्यापीठाने पोटभाडे करारावर घेतली आहे. त्याची मालकी विद्यापीठाकडे नाही. भाडे कराराची बाब सध्या न्यायप्रवि÷ आहे. तसेच या जागेची विक्रीची चर्चा वस्तुस्थितीस धरुन नसल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.
पत्रकारीता विभागास सध्या उपलब्ध जागा मर्यादीत असल्याने तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणामुळे बांधकाम व दुरुस्ती मर्यादा असल्यामुळे भौतिक सोयी सुविधांचा प्रश्न नेहमी विद्यापीठ अधिकार मंडळापुढे मांडण्यात आला. तसेच वसतीगृहात राहणाऱया पदवीच्या विद्यार्थ्यांना रानडे इन्स्टिटय़ूटमध्ये जाण्यासाठी विद्यापीठातून ये-जा करावी लागते. ह्या अडचीणी लक्षात घेता विद्यापीठाने विभाग स्थलांतराचा निर्णय घेतला होता, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
- या अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेले निर्णय
एकत्रित केलेल्या दोन्ही विभागांचे सर्व अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. तसेच एम. सी. जे. (प्रवेश क्षमता 36) हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या मुख्य आवारात स्थलांतरित करून त्यास स्टुडिओसहित सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सदर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील ई. एम. एम. आर. सी व विद्यावाणी या संस्थांशी प्रशिक्षणासाठी जोडण्यात यावे. यासोबतच रानडे इन्स्टिटय़ूटमध्ये पूर्वीप्रमाणे पदविका अभ्यासक्रम सुरू राहील. त्यासोबत नोकरी करणाऱया विद्यार्थ्यांसाठी इतर करिअर ओरिएंटिड पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात यावेत.
दरम्यान, काल गुरवारी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या पदाधिकाऱयांसोबत विद्यापीठाच्या कुलगुरुंची बैठक झाली. यामध्ये पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या निवेदनानुसार रानडे इन्स्टिटय़ूट मधील पत्रकारिता विभाग तसेच अभ्याक्रमाचे एकत्रीकरण अथवा स्थलांतरास स्थगीती देल्याचे विद्यापीठाने जाहीर केले.