प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य सोसायटीतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य रंगमंदिर येथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी रोमा ठाकुर, उपाध्यक्ष डॉ. डी. पी. वागळे, सीएफओ वीरसिंग भोसले, सीईओ अभिजीत दीक्षित, संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, अनिल चौधरी, अजित गरगट्टी, सुरक्षा विभागप्रमुख निवृत्त कर्नल दीपक गुरुंग, समन्वयक विनायक जाधव आदी उपस्थित होते.