प्रतिनिधी /मडगाव
निष्पाप नागरिकांच्या गळय़ातील सोनसाखळय़ा खेचून नेणाऱया दोन आरोपींना मायणा कुडतरी आणि कुंकळळी पोलिसांनी अटक केली आहे.
हवलनगर -बेळगाव येथील अजय विजय बेघुलकर व दवर्ली मडगाव येथील महम्मद सर्फराज यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या या आरोपींची सखोल चौकशी चालू असून चोरीचा माल जप्त करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची मायणा- कुडतरी पोलीस चौकशी करीत आहेत.
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग, उपअधीक्षक हरीष मडकईकर, पोलीस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरत खरात व उपनिरीक्षक दीपेश शेटकर यांनी ही अटक केली. या कामी इतर अनेक पोलीस कर्मचाऱयांनी साहाय्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.