प्रतिनिधी /पणजी
बार्देश तालुक्यात 1 एप्रिल 2005 रोजी जन्मलेल्या पूनम चंद्रकांत पालयेकर हिच्या कलाकौशल्याची नोंद ‘इंडिया बुक रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. तिने शिवोली येथील वसंत विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतले व सध्या ती सेंट फ्रान्सिस झेवियर उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या संपादकीय विभागाने तिच्या कौशल्याची दखल घेऊन तिच्या प्रयत्नांची व संयमाची प्रशंसा केली आहे. या यशाबद्दल पूनम पालयेकर हिचे परिसरात अभिनंदन होत आहे.
देवी सरस्वती, नटराज, ताजमहल, कुतुबमिनार, हत्ती, मोरपंख, कमळ, वाघ, मातीची भांडी, मंडला कला यांच्यासह आकर्षक कार्डबोर्ड फुलदाणी बनविल्या आहेत. 183 सेमी उंची व 44 सेमी रुंदी अशापद्धतीने फुलदाणी बनविलेल्या आहेत. या कलाकौशल्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.