1000 कोटी कर भरावा लागणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हिंदुजा समूहाचे अध्यक्ष प्रकाश हिंदुजा यांना कथित करचोरीच्या प्रकरणात स्वित्झर्लंडच्या फेडरल न्यायालयातून दिलासा मिळालेला नाही. करचोरीप्रकरणी त्यांना 13.7 कोटी डॉलर (सुमारे 1000 कोटी रुपये) कर भरावा लागणार आहे. याप्रकरणी त्यांनी कर न भरल्यास न्यायालयाने त्यांची संपत्ती गोठवण्याचा आदेशही कायम ठेवला आहे. स्वित्झर्लंडच्या सर्वोच्च न्यायालयाने स्विस कर प्राधिकरणाचा आदेश कायम ठेवला आहे. कर वाचवण्यासाठी त्यांनी आपण मोनाकोचा नागरिक असल्याचे सांगितले होते. तसेच स्वतःच्या मालमत्तेचे मूल्यही कमी केले होते.