गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी, गेल्या दोन दिवसात कोट्यावधीची उलाढाल
प्रतिनिधी / कोल्हापूर
लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या पाचच दिवसावर आल्याने शहरात आनंदाचे वातावरण पसरु लागले आहे. बाजारपेठेतील स्टॉल, दुकानांमध्ये आरास साहित्यापासून एलईडी लाईटपर्यंत आणि पुजेच्या साहित्यापासून नाराळापर्यंतच्या साहित्यांची मांडणी केली आहे. रविवारच्या सुट्टीमुळे बाप्पांच्या प्रतिष्ठापनेसाठी लागणाऱया आराससह विविध प्रकारचे साहित्य घेण्यासाठी हजारो गणेशभक्त दिवसभर बाजारपेठेत दाखल झाले होते. त्यामुळे बाजारपेठेताल येऊन जोडलेल्या पापाची तिकटी व छत्रपती शिवाजी चौक, बिंदू चौक, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी जनता बझार चौक, आईचा पुतळा या रस्त्यांवर गर्दीच गर्दी होती. अशा वातावरणातच कोरोनामुळे गेली सहा महिने बाजारपेठेतील थंडावलेले खरेदी-विक्रीचे व्यवहार गतीमान झाल्याने अर्थचक्रालाही मोठी गती मिळत आहे.
गणेशोत्सवात लाडक्या बाप्पांना नक्षीदार मखर, मंदिर, मंडप अथवा आकर्षक आरासमध्ये प्रतिष्ठापना करण्याची हौस वर्षागणिक वाढतच चालली आहे. त्यामुळे बाजारपेठेत आरास साहित्यांची मोठÎा प्रमाणात मांडणी केली आहे. यात लक्षवेधी ठरत आहेत, ती म्हणजे विविध रंगाच्या आणि टिकलीवर्क लायक्रा, वेलवेट, कोरीयन, सॅटीन या कापडांपासून तयार केलेली कापडी मंदिरे. या मंदिरांसोबत फायबर व प्लायवुडमध्ये नक्षीकाम करुन बनवलेल्या मखर व मंदिरांनाही गणेशभक्तांची पसंती मिळत आहे. 3 ते 7 फुट उंचीपर्यंतची ही मखर व मंदिरे आहेत. कापडी मंदिरे घरी अथवा मंडळाच्या मंडपात उभारता यावीत यासाठी जोडकाम करता येईल, अशा पद्धतीच्या फायबरच्या नळ्याही मंदिराच्या आकारांनुसार विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत. मखर, मंदिरांची सुंदरता अधिक खुलवण्यासाठी विविध रंगाच्या फुलांच्या माळा व झिरमुळ्यांचीही मोठÎा प्रमाणात गणेशभक्तांनी खरेदी केली. गौराई-शंकरोबाच्या भोवतीने आरास करण्यासाठी लायक्रा कापडासह वेलवेटपासून बनवलेली वेलकम कमान, कोरियन टिकलीवर्कमधील कापडांना मोठी मागणी आली.
आरास साहित्यासह एलईडीची मोठी उलाढाल
अनेक गणेशभक्तांनी भगवा, पिवळा, निळा, गुलाबी, लाल व हिरव्या रंगांमधील विविध डिझाईनच्या लटकणींसह झिरमुळ्या, तोरण, झुंबरांच्या खरेदीला प्राधान्य दिले. आवडीचे आरास साहित्य घेतल्यानंतर अनेकांनी आपला मोर्चा एलईडी लाईटस्ची विक्री करणाऱया इलेक्ट्रीक दुकानांकडे वळवून मल्टीकलर बल्बचे फोकस, रनिंग लाईटसह डायमंड हॅगिंग लाईट, लहान शार्पी, छोटे लेझर, रोटेडिंग बल्ब, हॅगिंग समई, सिंगल लाईट फिक्सल, फिक्सल मल्टीकलर लाईट, स्वस्तिक, स्टार लाईट, खरेदी केली. त्यामुळे इलेक्ट्रीक दुकानदारांना थोडा दिलासा मिळाला आहे.
पुजेच्या साहित्याची मोठी उलाढाल
गणेशमूर्तीच्या पुजेसह गौरी आगमन व आवाहनाअंतर्गत केल्या जाणाऱया आरती सोहळ्यासाठी लागणारे कापूर, सुपारी, गेजावस्त्र (पवतं), धुपकांळी, अगरबत्ती, गंधगोळी, समईवात, अष्टगंध, अत्तरासह विविध प्रकारच्या साहित्यांचे जोतिबा रोडवर अनेक स्टॉल उभारले आहेत. शहरातील बहुतेक दुकानांमध्ये ही या पूजा साहित्यांची मांडणी करण्यात आली आहे. रविवारी दिवसभरात अनेक घरगुती गणेशभक्तांनी स्टॉलला भेट देऊन तेथील पूजा साहित्याची खरेदी केली.