वार्ताहर / कासेगाव
तांबवे येथे एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीची घटना घडली आहे. याबाबत कासेगाव पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी की, तांबवे येथील हणमंत दत्तू पाटील (वय ६५) हे त्यांच्या कुटुंबासाहित घराच्या वरच्या मजल्यावर राहत असल्याचा फायदा घेत घराच्या दरवाजाची कडी उचकटून घरफोडी करीत चोरट्यांनी ४ तोळे सोने, लहान मुलाचे चांदीचे दागिने व चांदीच्या वस्तू व ५० हजार रोख रक्कम असा सुमारे दीड लाख रुपयेचा ऐवज लंमपास केला आहे. तर जयवंत मोहन पाटील यांच्या घरी मनी मंगळसूत्र व सोन्याची चैन असा सुमारे ३४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तर किसन दत्तू पाटील यांच्या घरी देखील चोरीचा प्रयत्न झाला परंतु घरातील लोक जागे झाल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी पलायन केले.
याप्रकरणी हणमंत दत्तू पाटील यांच्या तक्रारीवरुन कासेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गावातील सीसीटीव्हीमध्ये चोर दिसून आले असून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. कासेगाव पोलीस स्टेशनचे महेश गायकवाड तपास करीत आहे.