प्रतिनिधी / असळज
वैभववाडी जि.सिंधुदुर्ग येथून बिगरपरवाना वाळूची वाहतूक करणा-या चार वाहनांवर आज गगनबावडा तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांनी कारवाई केली. त्यांना प्रत्येकी अडीच लाख प्रमाणे दहा लाख रुपये दंड करण्यात आला आहे. याबाबत गगनबावडा तहसीलदार कार्यालयातून समजलेली अधिक माहिती अशी की, कोकणातून कोल्हापुरकडे दररोज गौण खनिज वाहतूक सुरू असते.
या वाहतूकी दरम्यान आज अचानक गगनबावडा महसूल विभागाने तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात बिगर पास वाळूची वाहतूक करणारे कोल्हापुरकडे जाणारे चार ट्रक आढळून आले. त्यांना प्रत्येकी अडीच लाख प्रमाणे दहा लाख रुपये दंड करण्यात आला आहे.