व्हिडिओ करणाऱया महिलेला धमकावले, एफआयआर दाखल
प्रतिनिधी /बेळगाव
कामगार खात्याकडून वितरित करण्यात आलेले फूडकीट मुदतबाहय़ झाल्यानंतर त्याचे वितरण करण्यात आले. यावेळी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटींग करणाऱया महिलेला शिवीगाळ करून तिला धमकावणाऱयांविरुद्ध शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कनकदासनगर-जुने बेळगाव येथील सरला सागर सातपुते या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पाच ते सहा जणांविरूद्ध भा.दं.वि. 143, 147, 341, 354, 504, 506 सहकलम 149 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर पुढील तपास करीत आहेत.
फूडकीटच्या मुद्दय़ावर काँग्रेस, भाजप कार्यकर्त्यांमध्ये जुंपले आहे. नारायण कामकर, प्रमोद कामकर, शंकर हुलमनी यांच्यासह पाच ते सहा भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची फिर्याद महिलेने दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
उपलब्ध माहितीनुसार 20 सप्टेंबर रोजी दुपारी चावडी गल्ली-वडगाव येथील जिव्हेश्वर मंदिरात कामगार खात्याकडून देण्यात आलेले कालबाहय़ (एक्स्पायरी झालेले) फूडकीटचे वितरण करण्यात येत होते. त्यावेळी सरला सातपुते यांनी त्याचा व्हिडिओ शुटींग सुरू केला. ही गोष्ट लक्षात येताच सरला यांचा मोबाईल काढून घेऊन त्यांना धमकावण्यात आले.
काही जणांनी मोबाईल हिसकावून घेऊन व्हिडिओ डिलीट करण्यास भाग पाडले. त्यानंतर ही गोष्ट येथेच संपत नाही. पुढे तुझे काय होते बघ, असे धमकावल्याचे सरला यांनी फिर्यादीत म्हटले आहे. रविवारी ही घटना घडली असली तरी शहापूर पोलिसांनी सुरुवातीला एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ सुरू केली होती. काँग्रेस नेत्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेऊन पोलीस अधिकाऱयांना जाब विचारताच एफआयआर दाखल करण्यात आला आहे.