छत्रपती शिवाजी चौक, एमएलजी हायस्कूलजवळ उभारणार चफ्पल स्टॅण्ड, दर्शन रांगेत जातेवेळी क्यूआर कोड अथवा मोबाईलवरील मेसेज दाखवावा लागणार
प्रतिनिधी/कोल्हापूर
पाच महिन्यांचा अपवाद वगळता गेली 12 महिने करवीर निवासिनी अंबाबाई आणि दख्खन राजा जोतिबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आतूर झालेल्या भाविकांना नवरात्रौत्सवातील दर्शनासाठी मंगळवारी दुपारी 4 वाजल्यापासून खुल्या केल्या जाणाऱया लिंक नोंदणी करता येणार आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी www.mahalaxmikolhapur.com आणि वाडीरत्नागिरीवरील जोतिबाच्या दर्शनासाठी shreejyotiba.com या संकेतस्थळांद्वारे नोंदणी करता येईल. नोंदणी करतेवेळी प्रत्येकाला आपल्या मोबाईल नंबरसह आधारकार्डवरील नंबर भरावाच लागणार आहे. ही प्रक्रीया ऍण्ड्राईड फोनद्वारे पूर्ण करणाऱ्या भाविकाला क्यूआर कोड प्राफ्त होईल. जे भाविक साध्या फोनवरुन नोंदणी करतील, त्यांना दर्शनास पात्र असल्याचा मेसेज प्राफ्त होईल. दर्शनासाठी क्यूआर कोड आणि मेसेज देवस्थान समितीच्या कर्मचाऱयांना दाखवल्यानंतरच भाविकांना दर्शन रांगेत सोडले जाईल, अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितली.
अंबाबाईच्या दर्शनासाठी एक रांग छत्रपती शिवाजी चौकातून आणि दुसरी रांग भवानी मंडपनजिकच्या एमएलजी हायस्कूलजवळून अंबाबाई मंदिराच्या पूर्व दरवाजाच्या दिशेने लावली जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी 2 हजार चफ्पल स्टॅण्ड उभारण्यात येणार आहेत. रांगेत येताना सर्वप्रथम भाविकास हात धुवावा लागेल. त्यासाठी शिवाजी चौक व एमएलजी हायस्कूलजवळ रोज पाण्याच्या ट्रकरची सोय केली जाणार आहे. हात धुतल्यानंतर थर्मल क्रीनिंग व सॅनिटायझरची प्रक्रीया भाविकांना करावी लागेल. या प्रक्रीयेनंतर दर्शन रांगेकडे जाताना भाविकांना आपल्या मोबाईलवर प्राफ्त झालेला क्यूकोड अथवा दर्शनास पात्र असल्याचा मेसेज देवस्थान समितीच्या कर्मचाऱयांना दाखवावा लागेल.
पोलीसांना 300 जवानांची मदत अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसह शिवाजी चौक व एमएलजी हायस्कूलकडून मंदिराकडे येणाऱया दर्शन रांगेला शिस्त लावण्यासाठीच्या कामासाठी मंदिर व परिसरात 300 पोलीसांचा फौजफाटा तैनात असणार आहे. तसेच त्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील 300 जवानही मंदिर व परिसरात तैनात केले जाणार आहेत.
सॅनिटायझरची 5 आधुनिक मशिन देवस्थान समिती खरेदी करणार…
उत्सवकाळात अंबाबाईच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहणाऱया भाविकांना जागोजागी हातावर सॅनिटायझर घ्यावे लागणार आहे. त्यासाठी देवस्थान समितीकडून आधुनिक बनावटीची पाच मशिन खरेदी करण्यात येणार आहेत. या मशिन मधून भाविकांच्या हातावर सॅनिटायझरची फवारणी तर होईलच, शिवाय हाताचे थर्मल क्रीनिंगही होणार आहे. एका मशिनची किंमत 30 ते 40 हजार रुपये असल्याचे समिती सचिव नाईकवाडे यांनी सांगितले.
दर्शन रांगेत गरोदर महिलांनी प्रवेश नाही…
ज्या महिला भाविक गरोदर आहेत, त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाईच्या दर्शन रांगेत प्रवेश दिला जाणार नाही. तसेच जे भाविक आजारी आहेत अथवा खोकला, सर्दीने त्रासले आहेत, त्यांनीही स्वतहून अंबाबाईच्या दर्शनासाठी येणे टाळावे, असेही आवाहन नाईकवाडे यांनी केले आहे.
स्थानिक भाविकांनी विना चफ्पल दर्शनास यावे…
ऊत्सव काळात अंबाबाईच्या दर्शनास येणाऱया भाविकांची संख्या वाढतच जाणार आहे. भाविकांच्या चफ्पला सुरक्षित रहाव्यात यासाठी देवस्थान समितीने छत्रपती शिवाजी चौक व एमएलजी हायस्कूलजवळ चफ्पल स्टॅण्डची मेठी सोय केली असली तरी त्याचा वापर परगावाच्या भाविकांकडून केला जावा असे अपेक्षित आहे. त्यामुळे स्थानिक भाविकांनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येताना विना चफ्पलच यावे, असे आवाहन नाईकवाडे यांनी केले आहे.