अनेक विषयांवर झाली सांगोपांग चर्चा
दोडामार्ग / वार्ताहर:
दोडामार्ग तालुका राष्ट्रीय काँग्रेसची मासिक बैठक नुकतीच संपन्न झाली. आगामी दोडामार्ग नगरपंचायत तसेच अन्य विषयांवर या बैठकीत चर्चा विनिमय झाली. येथील सोनचाफा हॉटेल येथे तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. सुरुवातीला कुडाळ तालुकाध्यक्ष आबा मुंज यांना आदरांजली वाहण्यात आली. आगामी दोडामार्ग नगरपंचायत निवडणूकी संबंधी चर्चा करण्यात आली तसेच पक्षवाढीसाठी सर्व मिळून काम करण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीला जिल्हा चिटणीस सुभाष दळवी, तालुकाउपाध्यक्ष शिवदास मणेरीकर, तालुका सरचिटणीस सुमंत मणेरीकर, दोडामार्ग शहराध्यक्ष सुधीर गवस, यांसह सुधीर चांदेलकर, बाबू गवस, राजेंद्र गोवेकर, वासुदेव चोर्लेकर, विशाल नाईक, ज्ञानेश्वर गवस आदी उपस्थित होते.