सिंधुदुर्ग :
लेह येथे सिनिअर सुपरिटेंडंट ऑफ पोलीस या वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले सिंधुदुर्गचे सुपुत्र राजीव ओमप्रकाश पांडे (आयपीएस) यांची चार वर्षाच्या प्रतिनियुक्तीवर दिल्ली येथील राष्ट्रीय इन्व्हिस्टिगेशन एजन्सीत (एन. आय. ए.) वरिष्ठ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नॅशनल इन्व्हिस्टिगेशन एजन्सी ही देशविघातक कारवाया करणाऱया संस्था, व्यक्ती व प्रवृत्तींवर करडी नजर ठेवून, त्यांच्यावर कारवाई करणारी राष्ट्रीय संस्था आहे. केवळ देशातच नव्हे, तर देशाबाहेरही अतिशय गुप्तपणे या संस्थेचे काम सुरू असते. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एन. आय. ए. ची कामगिरी अतिशय महत्वपूर्ण समजली जाते. राजीव पांडे यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत सावंतवाडीत शिक्षण घेतले. पांडे हे 2010 बॅचचे आय. पी. एस. अधिकारी आहेत.