प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर तालुका माजी सैनिक आर्मी, नेव्ही, एअरफोर्स संघटनेची बैठक नुकतीच संघटनेच्या कार्यालयात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॅ. पांडुरंग मेलगे उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत सेक्रेटरी धाकलू हेब्बाळकर यांनी करून बैठकीचा उद्देश विशद केला व मागील बैठकीचे इतिवृत्त सादर केले. तर अध्यक्ष कॅ. पांडुरंग मेलगे आपल्या भाषणात म्हणाले, की नागुर्डा येथील नायक संतोष कोलेकर यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियावर ओढवलेल्या दुःखात संघटना सहभागी आहे. तसेच त्यांच्या कुटुंबाला केणत्याही कार्यालयीन अडचणी आल्यास सर्व सदस्यांनी साहाय्य करायला तयार रहावे, असे सांगितले.
यावेळी कार्याध्यक्ष सुभेदार गोपाळराव देसाई यांनी संघटनेच्या कार्याबद्दल विचार व्यक्त केले. तसेच या संघटनेत हवालदार सिद्राय पांडुचे, प्रकाश निट्टूरकर, कृष्णा आवकुळे, अनिल गोरे, राघवेंद्र पाटील यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. संघटनेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सुभेदार राजाराम पाटील यांनी आभार मानले.