पब-ऑफिसमध्ये धूम्रपानावर बंदी
अधिक काळ जगण्याचे केवळ एकच रहस्य आहे आणि ते म्हणजे लोकांनी चांगला आहार घ्यावा, चिंतेपासून दूर रहावे आणि स्वतःला चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवावे. आपल्याला किंवा स्वकीयांना दीर्घायुष्य मिळावे अशी प्रत्येकाची इच्च्छा आहे. पण सर्वसाधारणपणे असे घडणे कठिण आहे. पण एका गावातील आयुर्मान सर्वात अधिक असून तेथील महिला पुरुषांपेक्षा अधिक काळ जगतात.
इंग्लंडमधील डेटलिंग आणि थर्नहॅम केंट ही ती गावे आहेत. या दोन्ही गावांमधील आयुर्मान अत्यंत अधिक आहे, पण डेटलिंगमधील महिलाचे सरासरी आयुर्मान 95 वर्षे आहे. तर पूर्ण ब्रिटनमध्ये लोकांचे सरासरी आयुर्मान 83 वर्षे आहे म्हणजेच 12 वर्षांनी कमी आहे.
याहून आश्चर्याची बाब म्हणजे या गावातील पुरुष महिलांच्या तुलनेत केवळ 86 वर्षांपर्यंत जगतात. पूर्ण इंग्लंडमध्ये या गावातील लोक सर्वाधिक काळ जगतात. गावात इनडोअर स्मोकिंगवर बंदी आहे.
वृद्धांचे प्रमाण अधिक
नॉर्थ डाउन्सनजीकच्या डेटलिंग गावात 800 लोक राहतात. यातील अनेक जण ब्रिटनच्या सर्वात वृद्ध लोकांच्या यादीत सामील आहेत. गावाती लोक आरोग्यावर विशेष लक्ष देतात. गावात 8 डॉक्टर असल्याने वैद्यकीय सुविधा प्राप्त होण्यास विलंब लागत नाही. गावात एक नैसर्गिक जलाशय असल्याने स्वच्छ पाणी सहजपणे उपलब्ध होते.येथील लोकांमध्ये कलह नाही, कोरोनाच्या संकटकाळात लोकांनी परस्परांची अत्यंत उत्तमप्रकारे काळजी घेतली आहे.
ब्लूमफील्ड अन् धूम्रपान
इंग्लंडच्या ब्लॅकपूल येथील ब्लूमफील्ड भागातील आर्युमान महिलांसाठी केवळ 73 वर्षे आहे, तर पुरुषांसाठी हे प्रमाण 67 वर्षे आहे. या भागातील लोक अत्यंत अधिक प्रमाणात धूम्रपान करत असल्याने हे घडत असावे. 2013 च्या एका अहवालानुसार प्रत्येकी 3 गरोदर महिलांपैकी एक महिला येथे धूम्रपान करत होती. 2019 च्या आकडेवारीनुसार भारतातील सरासरी आयुर्मान 69.66 वर्षे आहे.