वृत्त संस्था/ अमिरात
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱया चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रमुख प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग शनिवारी न्यूझीलंड संघात दाखल झाले आहेत. न्यूझीलंड संघाचे माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग यापूर्वी आयपीएल क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱया चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. चेन्नईच्या खेळाडूंना त्यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
2021 आयपीएल स्पर्धेचे चेन्नई सुपर किंग्जने अजिंक्यपद मिळविताना शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात कोलकोता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव पेंला. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने आतापर्यंत चारवेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. शुक्रवारी ही स्पर्धा संपल्यानंतर प्रशिक्षक फ्लेमिंग न्यूझीलंडच्या संघात दाखल झाला.
न्यूझीलंड संघाचा टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेंतील सलामीचा सामना 26 ऑक्टोबरला शारजाहच्या क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर न्यूझीलंडचा दुसरा सामना 29 ऑक्टोबरला भारताविरुद्ध दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. या स्पर्धेसाठी गट-1 मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, विंडीज आणि पात्र फेरीतील दोघांचा समावेश आहे. टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला ओमानमध्ये रविवार दि. 24 ऑक्टोबरला प्रारंभ होणार असून अंतिम सामना 14 नोव्हेंबरला खेळविला जाईल.