कंपनीचे सीओओ व सीएफओ यांचा राजीनामा
नवी दिल्ली
मोबिलिटी प्लॅटफॉर्म ओलामध्ये आयपीओ येण्याअगोदरच मोठी उलथापलथ होत आहे. यामध्ये कंपनीची मुख्य धुरा सांभाळणाऱया अधिकाऱयांनी आपली पदे सोडली असल्याने मोठी खळबळ माजली आहे. बेंगळूरची कंपनी असणारी ओला ही पुढील वर्षात आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. परंतु त्या अगोदरच मागील आठवडय़ात कंपनीचे मुख्य ऑपेरटिंग ऑफिसर(सीओओ) गौरव पोरवाल आणि मुख्य फायनाशिअल ऑफिसर(सीएफओ) स्वयं सौरभ यांनी राजीनामा दिला आहे. ओलाचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी कंपनीच्या कर्मचाऱयांना अंतर्गत स्वरुपात पाठविण्यात आलेल्या ईमेलमधून संबंधीत अधिकाऱयांनी दिलेल्या राजीनाम्या संदर्भात खुलासा केला आहे. व हा राजीनामा म्हणजे कंपनीचे नुकसान नसुन कंपनीची पुनर्रचना असल्याचा खुलासाही यावेळी केला आहे.