इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, गृह प्रकल्प, सोने-चांदी, कपडे खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी
प्रतिनिधी/ बेळगाव
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर शुक्रवारी बेळगाव बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल झाली. दीड-दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री झाल्याने लहान विपेत्यांपासून मोठय़ा व्यापाऱयांपर्यंत सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, गृह प्रकल्प, सोने-चांदी, कपडे यासह इतर खरेदी मोठय़ा प्रमाणात करण्यात आली. बेळगावसह कोकण व गोव्यातील ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.
टीव्ही, फ्रीजला वाढती मागणी
पाडव्याला इलेक्ट्रॉनिक वस्तूंची उलाढाल मोठय़ा प्रमाणात झाली. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, इन्व्हर्टर, मिक्सर ग्राईंडर, इस्त्री, होम थिएटर, व्हॅक्मयूम क्लिनर, मोबाईल यांसह इतर वस्तू खरेदी केल्या जात होत्या. एचडी क्वॉलिटीच्या एलईडी, टीव्हींना सर्वाधिक मागणी होती. यासोबत मोबाईल दुकानांमध्येही खरेदीसाठी मोठी गर्दी होती.
खरेदीवर आकर्षक सूट
खरेदी अधिकाधिक व्हावी यादृष्टीने आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या होत्या. सोने-चांदी, डायमंड यासह दुचाकी, चारचाकी, सहाचाकी वाहन खरेदीवर ऑफर्सच्या जाहिराती दिवाळीपूर्वीच देण्यात आल्या होत्या. कपडे खरेदीसाठी सेलच्या माध्यमातून सूट देण्यात आली होती. यामुळे दुकानांमध्ये खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती.
वाहन खरेदीला चांगले दिवस
ट्रक्टर, पॉवर टिलर यासह मोठी वाहने शुक्रवारी खरेदी करण्यात आली. दुचाकीसह चारचाकी वाहनांची मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यात आली. शहरातील शोरूममध्ये वाहन घरी घेऊन जाण्यासाठी सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी झाली होती. अनेकांनी चारचाकी वाहनांना आकर्षक पद्धतीने सजवून त्यांचे पूजन केले. ट्रक, कंटेनर, जेसीबी या वाहनांचीही खरेदी तेजीत होती. त्यामुळे दिवसभरात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून आले.