चिपळूण
एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱयांनी संप पुकारला आहे. या संपामध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उडी घेतली असून या संपाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. या बाबतचे निवेदनही चिपळूण मनसे पदाधिकऱयांनी संपात सहभागी एसटी कर्मचाऱयांना दिले आहे.
एसटी कर्मचाऱयांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन, आर्थिक समस्यांमुळे 30 हून अधिक कर्मचाऱयांनी केलेली आत्महत्या आणि महामंडळाच्या गैरकारभारामुळे एसटी कर्मचाऱयांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आहे. याची जाणीव राज्य सरकारला व्हावी, यासाठी पुकारलेल्या या संपाला चिपळूण मनसेने राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिल खानविलकर, तालुकाध्यक्ष संतोष नलावडे यांच्या नेतृत्वाखाली पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी तालुका उपाध्यक्ष अभिनव भुरण, विवेक मोरे, सुनील हळदणकर, तालुका प्रवक्ते प्रमोद महाडिक, शहर अध्यक्ष गणेश भोंदे, विभाग अध्यक्ष प्रताप भोसले, उपविभाग अध्यक्ष संकेश कदम, शाखाध्यक्ष मिलिंद देसाई, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अमोल अवेरे, उपाध्यक्ष गुरुनाथ नागे, शहर अध्यक्ष गुरू पाटील, प्रसार माध्यम प्रमुख प्रथमेश कदम, महिला तालुका अध्यक्ष शोभा पावसकर, उपशहर अध्यक्षा वृषाली सावंत, मनसैनिक उदय पवार, मंगेश शिंदे, वर्षा खटके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.