160 स्केटिंगपटूंचा समावेश
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेलगाम रोलर स्केटिंग अकादमी आणि एके ग्रूप ऍप्पल प्लाय यांच्यावतीने आयोजित रोलर स्केटिंग चॅम्पिनशिप स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार पडल्या. केएलई सोसायटी संचलित लिंगराज महाविद्यालयाच्या आवारातील स्केटिंग रिंकवर झालेल्या या स्पर्धेत 160 हून अधिक स्केटिंगपटूंनी भाग घेतला. 500 मीटर, 1 हजार मीटर गटात रिंक रेस स्पर्धेचे आयोजन केले गेले.
बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, उपविभाग अधिकारी सत्यनारायण, सेवानिवृत्त आर्मी अधिकारी परवेझ हवालदार, शिवराज, अत्ताऊल्ला जी. के., फिरोज दवडी, विनोद बामणे, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, रमेश परदेशी, सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर, गुरुनाथ होन्नगी, नैना शिवराज यांच्या उपस्थितीत स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.
क्वाड स्केटिंग मध्ये 5 वर्षांखालील मुलांच्या गटात विदित कल्याण, कुमार बीने दोन सुवर्ण तर गौरिक भातकांडेने 2 रौप्य पदके पटकाविली. 5 ते 7 वयोगटात मुलांच्या विभागात समिध कणगलीने 2 सुवर्ण, अवधूत मोरेने 2 रौप्य तर सार्थक चव्हाणने 2 कांस्य तर मुलींच्या गटात झिया काझीने 1 सुवर्ण 1 रौप्य, लावण्या लोहारने 1 रौप्य, 1 कांस्य व स्वरा शीलवंतने 1 सुवर्ण व 1 कांस्य पदक पटकावले.
7 ते 9 वयोगटात मुलांच्या विभागात अवनिष कामण्णावरने 2 सुवर्ण, आर्या कदमने 2 रौप्य, कुलदीप बिर्जेने 2 कांस्य, मुलींच्या विभागात आराध्या पी हिने 2 सुवर्ण, प्रांजल पाटीलने 2 रौप्य तर दृष्टी अंकलेने 2 कांस्यपदक पटकावले.
9 ते 11 वयोगटात मुलांच्या विभागात सत्यम पाटीलने 2 सुवर्ण, भव्या पाटीलने 2 रौप्य तर झियानअली तांबोळी व सुब्रमण्यम बागलकोट यांनी प्रत्येकी एक कांस्यपदक तसेच मुलींच्या गटात मोनिशा टीने 2 सुवर्ण, अनघा जोशीने 2 रौप्य तर राजनंदिनी नावगे हिने हिने 2 कांस्यपदक मिळविले.
11 ते 14 वयोगटात मुलांच्या विभागात श्री रोकडे यांने दोन सुवर्ण, सौरभ साळुंखे याने दोन रौप्य तर गौरांग खोत याने 2 कांस्य मिळविले. मुलींच्या गटात जान्हवी तेंडुलकरने 1 सुवर्ण, शर्वरी दड्डीकर हिने एक सुवर्ण एक कास्य, सानवी इटगीकर हिने 1 रौप्य व 1 कांस्य तर अमेय मानेने 1 सुवर्ण, 1 रौप्यपदक मिळविले.
14 ते 17 वयोगटात मुलांच्या विभागात यशवंत परदेशीने 2 सुवर्ण, आदर्श निकम याने 2 रौप्य तर हर्षवर्धन दाभाडेने 2 कांस्यपदक तसेच मुलींच्या गटात साक्षी रामणकट्टीने 2 सुवर्ण तर सानिका कंग्राळकरने 2 रौप्यपदक मिळविली. 17 वर्षावरील मुलांच्या विभागात सतीश वडेरने 2 सुवर्ण मुलींच्या विभागात भक्ती हळदणकरने 2 सुवर्ण व खुशी गोठीवरेकरने 2 रौप्यपदक मिळविली.
इनलाईन स्केटिंग प्रकारात 5 ते 7 वर्ष वयोगटात मुलांच्या विभागात धीमंत कुलकर्णीने 2 सुवर्ण तर आदित्य लगाडेने 2 रौप्य पदक पटकाविले. मुलींच्या विभागात आराध्या बामनगोळने 2 सुवर्ण तर आरोही शिलेदारने 2 रौप्य पदक पटकाविले.
7 ते 9 वयोगटातील मुलांच्या विभागात विहान कणगलीने 2 सुवर्ण, हिरेन राजने 2 रौप्य तर अर्शन माडीवालेने 2 कांस्यपदक तसेच मुलींच्या विभागात वेदांतिका मानेने 2 सुवर्ण पदक मिळविले.
9 ते 11 वयोगटात मुलांच्या विभागात अवनीश कोरीशेट्टीने 2 सुवर्ण, दक्ष नाईकने 2 रौप्य तर अथर्व भुतेने 2 कास्यपदक तसेच मुलींच्या विभागात साई शिंदेने 1 सुवर्ण, 1 रौप्य, सिया परेराने 1 रौप्य 1 सुवर्ण तर सिद्धी रामणकट्टीने 2 कास्य पदक मिळविली.
11 ते 14 वयोगटात मुलांच्या विभागात अनराय ढवळीकरने एक सुवर्ण 1 रौप्य, आरुष दीक्षितने 1 रौप्य 1 सुवर्ण तर जयधन राजने 2 कास्य तसेच मुलींच्या विभागात तुळसी हिंडलगेकरने 2 सुवर्ण पदक पटकावली.
14 ते 17 वयोगटात मुलांच्या विभागात अमेय याळगीने 2 सुवर्ण तर देवन बामणेने 1 रौप्य तसेच मुलींच्या विभागात वेदिका घडशी हिने 2 सुवर्ण पदक मिळविली. 17 वर्षांवरील मुलांच्या विभागात यशपाल पुरोहितने 2 सुवर्ण तर मुलींच्या विभागात अनुष्का शंकरगौडाने 2 सुवर्णपदके पटकाविली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, शुभम साखे, सक्षम जाधव, भरत पाटील, प्रकाश पाटील, श्रीनिवास जाधव, प्रशांत कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.