प्रतिनिधी / कोल्हापूर
पोटच्या मुलीचा लैंगिक छळ करणार्या बापाला जिल्हा व सत्र न्यायाधीक्ष व्ही. व्ही. जोशी यांनी आठ वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड आणि दोन वर्ष तुरुंगवास आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे ऍड. मंजुषा पाटील यांनी युक्तीवाद केला.
टेंबलाईवाडी येथे 9 नोव्हेंबर 2020 रोजी राहत्या घरी आरोपीने पोटच्या मुलीला अश्लिल व्हिडिओ दाखवत लैंगिक छळ केला. तसेच या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास मुलीची आई, आजी व भावाला ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मुलीच्या आईला समजल्यानंतर तिने नवर्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार बापावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये याप्रकरणी सुनावणी सुरु असताना बुधवारी न्यायाधीक्ष व्ही. व्ही जोशी यांनी आरोपीला शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे ऍड. मंजुषा पाटील यांनी 6 साक्षीदार तपासले. ऍड. पाटील यांचा युक्तीवाद ग्राह्य धरत आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. याप्रकरण पोलीस नाईक अशोक शिंगे यांचे सहकार्य मिळाले. तपास अधिकारी म्हणुन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. घुगे, अंजना फाळके यांनी काम पाहीले.