प्रतिनिधी/ रत्नागिरी
संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱयांची कामावर येण्याची संख्या वाढत आह़े आतापर्यंत रत्नागिरी विभागातील 537 कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत़ मंगळवारी विभागातून एसटीच्या एकूण 178 फेऱया सोडण्यात आल्य़ा यामध्ये तब्बल 3 हजाराहून अधिक प्रवाशांची एसटीच्या सेवेचा लाभ घेतल़ा
रत्नागिरी विभागात एसटीचे प्रशासन, कार्यशाळा, यांत्रिकी, चालक-वाहक असे मिळून 4 हजार 200 कर्मचारी आहेत़ मंगळवार सायंकाळपर्यंत यातील 537 कर्मचारी कामावर हजर राहिले आहेत़ यामध्ये 46 कर्मचारी अधिकृत सुट्टीवर असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आल़े एसटी कर्मचारी कामावर हजर होत असल्याने मंगळवारी जिह्याच्या विविध आगारातून 178 फेऱया सोडण्यात आल्य़ा या फेऱयांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आह़े मंगळवारी 3 हजार प्रवाशांची एसटीच्या फेऱयांचा लाभ घेतल़ा
कर्मचारी कमतरता, एसटी नियोजनात अडथळा
मौजे दापोलीः
राज्य परिवहन महामंडळाच्या दापोली आगारात संपावर गेलेल्यांपैकी 107 कर्मचारी हजर झाले आहेत. प्रारंभे लांब पल्ल्याच्या गाडय़ांऐवजी विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण बससेवा सुरू करण्यात आली आहे. दापोली आगारातील 366 कर्मचाऱयांपैकी निलंबन झालेल्या 34 पैकी 13 तर सेवा समाप्तीची नोटीस दिलेल्या 32 पैकी 5 जण व अन्य कर्मचाऱयांसह एकूण 107 कर्मचारी दापोली आगारात संपातून बाहेर येत सेवा बजावत आहेत. आगारातून येऊन-जाऊन 108 फेऱया होत आहेत. संपामुळे बंद झालेली दापोली आगारातील आर्थिक उलाढाल पुन्हा सुरू झाली आहे, परंतु सेवा सुस्थितीत येईपर्यंत आगारांना तोटय़ाचा सामना करावा लागणार आहे.
उपलब्ध कर्मचारी संख्येनुसार बससेवा
दापोली आगारात हजर झालेल्या कर्मचाऱयांच्या मदतीने ग्रामीण भागांमध्ये सेवा सुरू करण्यात आली आहे. लांबच्या बसेस बंद आहेत. कर्मचारी संख्येनुसार बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
-मृदुला जाधव,
दापोली आगारप्रमुख
चिपळूण आगारात ‘हजर’ कर्मचाऱयांची संख्या घटली
चिपळूणः शासनाच्या आवाहनानंतर 12 कर्मचारी हजर झाले होते. यातूनच काही एसटी फेऱया सुरु झाल्या होत्या. सद्यस्थितीत हजर 12 कर्मचाऱयांची संख्या घटून ती मंगळवारी 8वर येऊन पोहोचली होती. संख्या आणखी घटल्यास सुरु केलेले मार्गही बंद करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रशासनाकडील संपकरी कर्मचाऱयांनी कामगिरीवर हजर राहण्याच्या आवाहनास प्रतिसाद देत चिपळूण आगारात 12 चालक-वाहक हजर झाले होते. यातूनच रत्नागिरी, सावर्डे, पोफळी आदी मार्गावर एसटी फेऱया सुरु करण्यात आल्या होत्या. आणखी कर्मचारी हजर होण्याची चिन्हे निर्माण झालेली असतानाच दुसरीकडे हजर कर्मचाऱयांमध्येच घट झाली आहे. सुरुवातीला 12 कर्मचाऱयांनंतर आता 10 व मंगळवारी केवळ 8 कर्मचारी कामगिरीवर हजर झाले होते.