ओटावा
कॅनडात पहिल्यांदाच पांढऱया शेपटीच्या हरणाला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. माणसाची हालत खराब करणाऱया कोरोनाने जंगलातील प्राण्यांनाही सोडलेले नाही, हे यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रशासनाची कसरत वाढणार हे नक्की आहे. नॅशनल सेंटर फॉर फॉरेन ऍनिमल डिसीज यांच्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या सुरूवातीला घेतलेल्या नमुन्यावरून प्राण्यांना कोरोना होत असल्याची बाब स्पष्ट होते आहे. प्राणी आरोग्य जागतिक संघटना (ओआयइ) यांनी सांगितलं की, याआधी अमेरिकेतही अशी प्रकरणे समोर आली होती, पण हरणांमध्ये कोरोनाची लक्षणे मात्र नव्हती. हरणे एकदम आरोग्यदायी होती. पण आता जंगली हरणांना कॅनडात कोरोनाची लक्षणे दिसली आहेत. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये पाळीव प्राण्यांना कोरोना व्हायरसचा अल्फा व्हेरियंटचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले होते. अभ्यासकांनी याबाबत चिंता व्यक्त केलीय. कोरोना माणसाकडून प्राण्यांमध्ये फैलावतो आहे का हे आता पाहण्याची गरज असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.