कागल / प्रतिनिधी
एसटी संपामुळे सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हजारों गोरगरीब नोकरदारांचे भवितव्य अवलंबून असणाऱ्या एसटीचे खाजगीकरण थांबवून त्यांचे शासनात विलीनीकरण करून घ्यावे, या मागणीला पाठिंबा देवून एसटी कामगारांच्या लढयाला बळ देण्यासाठी बानगे येथील नागरिक आणि सर्व व्यापाऱ्यांनी आज कडकडीत बंद पाळून पाठिंबा दिला.
यावेळी सरपंच वंदना रमेश सावंत, उपसरपंच दत्तात्रय लंबे, हनुमान दुध संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सावंत, अमोल सावंत, माजी सरपंच अशोक पाटील, सागर पाटील, विलास पाटील, शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, सुनिल बोंगार्डे यांच्यासह सर्व दुकानदार, व्यापारी, सर्व संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सदस्य, तरूण मंडळानी गावातील सर्व व्यवहार बंद करून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपला पाठींबा दिला.