वृत्तसंस्था / कोलकाता
कोलकाता महापालिका निवडणुकीत एकूण 144 प्रभागांकरता मतमोजणी पार पडली आहे. तेथे तृणमूल काँग्रेसने 134 जागांवर आघाडी मिळवत अनेक ठिकाणी विजय मिळविला आहे. तर भाजपला केवळ 3 जागांवर यश मिळविले आहे.
पश्चिम बंगालमध्ये सत्तारुढ तृणमूल काँग्रेसने कोलकाता महापालिकेवर सलग तिसऱयांदा कब्जा केला आहे. या निवडणुकीत भाजपच्या काही नेत्यांनी यश मिळविले आहेत. यात भाजपच्या मीना देवी पुरोहित, सजल घोष आणि विजय ओझा सामील आहे.
ममता बॅनर्जी यांच्या कुटुंबातील एक सदस्य या निवडणुकीत विजयी झाला आहे. ममता बॅनर्जी यांचे बंधू कार्तिक यांच्या पत्नी काजरी यांनी यश मिळविले आहे. कोलकात्याच्या लोकांनी दिलेले प्रेम पाहून त्यांना सलाम करावासा वाटतो. हा विजय लोकशाहीचा आहे. हा राष्ट्रीय राजकारणाचा विजय असून बंगाल आणि कोलकाता पुढील मार्ग दाखवतील असे उद्गार ममता बॅनर्जी यांनी काढले आहेत.