नवी दिल्ली
पूर्णपणे लसीकरण झालेल्या प्रवाशांकरिता भारतीय हवाई क्षेत्रातील कंपनी गो एअर यांनी सवलतीची योजना जाहीर केली आहे. सदरच्या अंतर्गत प्रवाशांना विमान प्रवासाकरिता तिकिटांमध्ये 20 टक्के इतकी सवलत दिली जाणार आहे. सदरची सवलतही भारतात कोणत्याही शहरांना प्रवास करणाऱया प्रवाशांना दिली जाणार आहे. भारतातील प्रवाशांनाच याचा लाभ मिळणार आहे. प्रवाशांना कोविड 19 लसीकरण प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.