क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
क्रीडा भारती बेळगाव आयोजित भव्य क्रिडा स्पर्धेत व्ही. एम. शानभाग संघाच्या खेळाडुंनी यश संपादन केले आहे.
सदर स्पर्धेत थ्रोबॉल स्पर्धेत महिलांच्या गटात द्वितीय क्रमांक पटकाविला भोवरा खेळण्याच्या स्पर्धेत अथर्व जाधव, अथर्व पोटे, नारायण कोलेकर, प्रज्वल शिंदे व श्री सोमाईचे या खेळाडुंनी विजेतेपद पटकावले आहे. त्यांना क्रीडा शिक्षक परिट यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापिका गायत्री शिंदे व शिक्षक वर्गातून प्रोत्साहन लाभत आहे.