ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली आज जीएसटी परिषदेच्या 46 व्या बैठकीला सुरूवात झाली आहे. दिल्लीतील विज्ञान भवनात ही बैठक सुरू असून, बैठकीत जीएसटी दरातील बदलांची चर्चा होण्याची शक्यता आहे.
जीएसटी परिषदेने यापूर्वीच 1 जानेवारी 2022 पासून वस्त्रोद्योग उत्पादनांवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारे आणि वस्त्रोद्योग जीएसटी दरवाढीला विरोध करीत आहेत. त्यामुळे कपडे आणि पादत्राणांवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय टाळण्याबाबत आज जीएसटी परिषदेच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
तसेच या बैठकीत जीएसटीच्या 12 टक्के आणि 18 टक्के कर स्लॅबचे एकत्रिकरण करुन एकच कर ठेवण्यावरही चर्चा होऊ शकते, असेही सांगण्यात येते.