प्रतिनिधी/ बेळगाव
नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय शिक्षण गौरव पुरस्कार कार्यक्रमामध्ये मराठा मंडळचे प्राचार्य डॉ. डी. जी. कुलकर्णी यांना ‘एक्झंपलरी ऍकॅडमिक लिडर ऑफ द इयर 2021’ने गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथे उच्च शिक्षणावरील आठवी परिषद नुकतीच पार पडली. त्यावेळी कुलकर्णी यांना हा पुरस्कार देण्यात आला.
या पुरस्कारासाठी 350 नामांकने दाखल झाली होती. त्यापैकी केवळ 52 जणांची विविध क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. डॉ. कुलकर्णी यांचे शैक्षणिक कार्य, बदलत्या शैक्षणिक प्रवाहाचे संशोधन, कौशल्य विकास आणि तांत्रिक दृष्टिकोन या सर्व पैलूंची नोंद घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.