कासेगाव / प्रतिनिधी
वाळवा तालुक्यातील नेर्ले येथील विक्रमसिंह दिलीपराव पाटील वय ३० या युवकाने राहत्या घरी लोखंडी हुकाला वायरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याच्याजवळ सूसाइड नोट सापडली नसलेने आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
विक्रमसिंहच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार असून विक्रमसिंहच्या आत्महत्या बाबत भाऊ संग्रामसिंह याने कासेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार चंद्रकांत पवार तपास करत आहेत.