नवी दिल्ली
देशामध्ये इंधनाची विक्री डिसेंबर 2021 मध्ये जवळपास स्थिर राहिली आहे. या संदर्भात आकडेवारी सादर करण्यात आली आहे. यामध्ये डिसेंबर 2021 मध्ये इंधनाची एकूण विक्री 1.84 कोटी टन राहिली आहे. हाच आकडा डिसेंबर 2020 मध्ये 1.83 कोटी टन राहिला होता. परिवहन इंधनाच्या मागणीतील वृद्धीच्या दरम्यान औद्योगिक इंधनाची विक्री मात्र घसरली होती, परंतु मागणी स्थिर राहिली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत पेट्रोलियम योजना आणि विश्लेषणातील आकडेवारीनुसार इंधनाची विक्री नोव्हेंबर 2021 च्या तुलनेत डिसेंबर दरम्यान 7.6 टक्के अधिक राहिले.