बेळगाव : केरळ येथे होणाऱया आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगावच्या गोगटे कॉलेजच्या 6 फुटबॉलपटूंची राणी चन्नम्मा विद्यापीठ संघात निवड झाली असून हा संघ केरळला रवाना झाला आहे.
महात्मा गांधी विद्यापिठ कोटीयम केरळ येथे होणाऱया दक्षिण विभागीय आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी राणी चन्नम्मा विद्यापीठाचा संघ केरळला रवाना झाला आहे. या संघात गोगटे महाविद्यालायच्या 6 खेळाडूंचा समावेश असून योगेश सांगावकर, कौशिक पाटील, विशाल कामू, प्रणित चिगरे, सुशील पॉल, चैतन्य पाटील यांचा समावेश आहे.