ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनापासून बचाव करण्यासाठी देशात 16 जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरूवात झाली. आज या लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण होत असून, देशात 157 कोटी डोस देण्यात आले आहेत. त्यामध्ये 94 कोटी प्रौढ आणि 7.40 कोटी डोस 15 ते 18 या वयोगटातील मुलांनी घेतले आहेत.
केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात एकूण 156 कोटी 68 लाख 14 हजार 804 जणांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. देशातील एकूण लोकसंख्येच्या 64.31 टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर 89.16 म्हणजे 90.41 कोटी नागरिकांनी लसीचा फक्त पहिला डोस घेतला आहे. तर 10.99 कोटी नागरिकांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही. देशात आतापर्यंत 41 लाख 83 हजार 391 रुग्णांना बूस्टर डोस देण्यात आला आहे.
दरम्यान, भारतात 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 या वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत 3 कोटी 25 लाख 28 हजार 416 मुलांना लसीचा पहिला डोस घेतला आहे.