म्हापसाठी काम करण्याचा माझा संकल्प अधिक मजबूत
पणजी / प्रतिनिधी
भाजप सरकार आणि म्हापसाचे आमदार जोशुआ डिसोझा यांच्या आदेशानुसार मला मिळालेले कारणे दाखवा नोटीस अयोग्य आहेत यामुळे मी खचणार नाही तर मी म्हापसासाठी अधिक कठोर परिश्रम करण्यास प्रोत्साहित आहे असे आम आदमी पार्टीचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
आप गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि सत्कार आयोजित केले होते. मात्र हे निवडणूक मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन असल्याचे सांगून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
“मी माझ्या वाढदिवशी 3 जानेवारी रोजी रक्तदान शिबिर आणि सत्कार समारंभ आयोजित केला होता आणि 8 जानेवारी रोजी निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली त्यामुळे आठ तारखेपूर्वी करण्यात आलेल्या कार्यक्रमाला कारणे दाखवा नोटीस बजावणे समर्थनीय नाही असे ते म्हणाले.
याबाबत अधिक माहीती देताना माझ्या वाढदिवशी बोडगेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी देखील मला आणखी एक कारणे दाखवा नोटीस पाठवतील अशी शक्यता ही त्यांनी व्यक्त केली. तसेच भाजप सरकारला नोटिसा बजावण्याची सवय असल्याची टिका म्हांबरे यांनी केली. अशा नोटिसांमुळे म्हापसाच्या विकसाचे कोणतेच काम होणार नाही असा आरोप त्यांनी भाजपवर लावला.
पुढे बोलताना ते म्हणाले की “आम आदम पक्षाने म्हापसा येथे घरोघरी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली असून केजरीवाल यांचे आश्वासन म्हापसेकरांपर्यंत पोहोचत आहे. आम्ही लवकरच एक जाहीरनामा आणू जो विशेषतः म्हापसासाठीच असेल “आप’ला म्हापसेकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून घरोघरी जाऊन प्रचार करून आम्हाला असं दिसून येत आहे की, यावेळी लोकांना बदल हवा आहे. ‘आप’ची सत्ता येणे हा सर्वांचा निर्धार आहे”,