पूलावर पोहोचताच उडी मारून आत्महत्या करतात श्वान
सद्यकाळात काही व्यक्ती तणाव, नैराश्यात येऊन स्वतःचे जीवन संपवून घेतात म्हणजेच आत्महत्या करतात. माणूस आत्महत्या करतो, त्यामागील कारण जाणून घेता येते. परंतु जेव्हा एखादा प्राणी आत्महत्या करतो तेव्हा हैराण व्हायला होते. जगात एक असा पूल आहे, जेथून उडी घेत श्वान आत्महत्या करतात.
श्वान आणि पूल यांच्यात कसला संबंध आहे, की पूलावर येताच श्वान मृत्यूला मिठी मारतो हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा रहस्यमय पूल स्कॉटलंडमध्ये असून त्याला श्वानांच्या आत्महत्येसाठी ओळखले जाते. या पूलाला डॉग्स सुसाइड ब्रिज या नावानेही ओळखले जाते. या पूलाची उंची 50 फूट आहे. या पूलावर एखादा श्वान पोहोचल्यावर स्वतःहून पूलावरून उडी घेतो. आतापर्यंत या पूलावरून शेकडो श्वानांनी उडी घेत आत्महत्या केली आहे.
आतापर्यंत या पूलाच्या रहस्याचा कुणालाच उलगडा झालेला नाही. अखेर कुठलाच श्वान या पूलावरून आत्महत्या का करतो या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. आतापर्यंत या पूलावरून उडी घेणाऱया श्वानांपैकी 50 श्वानांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक लोक सांगतात. श्वानांच्या आत्महत्या पाहता तेथे एक नोटीसही लावण्यात आली आहे. या पूलाची निर्मिती 1950 मध्ये झाली होत. जेव्हापासून या पूलाची निर्मिती झाली तेव्हापासून अशाप्रकारच्या घटना घडत असल्याचे लोक सांगतात.
अनेक कहाण्या प्रचलित
या पूलाशी निगडित अनेक प्रकारचे किस्से-कहाण्या सांगण्यात येतात. काही लोक या पूलाला भूतप्रेतांशी जोडून पाहतात. पूलावर पोहोचताच श्वानांमध्ये भूत शिरते आणि ते स्वतःहून पूलावरून उडी घेत जीव देत असल्याचे अनेक लोकांचे म्हणणे आहे. या पूलावर काही तरी अजब असल्यानेच अशाप्रकारच्या घटना घडत असल्याचे आत्महत्या केलेल्या श्वानांच्या मालकांचे सांगणे आहे. पूलावर लेडी ऑफ ओव्हरटॉनचा आत्मा राहतो, स्वतःच्या पतीच्या मृत्यूनंतर लेडी ऑफ ओव्हरटॉन 30 वर्षांपर्यंत एकटय़ा राहत होत्या असे काही लोक सांगतात. परंतु या सर्व कहाण्याच असून पूलावरून श्वानांनी उडी घेण्यामागे काय रहस्य आहे याचे सत्य जगासमोर अद्याप आलेले नाही.