75 टक्के हिस्सेदारीची खरेदी : नवीन ध्येय प्राप्तीचा कंपनीचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टीव्हीएस मोटर कंपनीकडून करण्यात आलेल्या घोषणेनुसार कंपनी स्विस ई मोबिलिटी समूहामधील (एसइएमजी) 75 टक्के हिस्सेदारी सोबत अधिग्रहण करणार आहे. नॉर्टन मोटरसायकल आणि इजीओ मूव्हमेंटसह प्रीमियम आणि टेक्नॉलॉजी असणाऱया आघाडीच्या ब्रँडच्या पोर्टफोलियोच्या आधारे युरोपमध्ये विस्तार करण्यासाठी टीव्हीएस मोटार कंपनीला हातमिळवणीचा फायदा होणार आहे.
एसइएमजी, डिएसीएच क्षेत्राच्या आधारे ई मोबिलिटी सोल्यूशन क्षेत्रातील मोठी कंपनी राहिली आहे. सदरची कंपनी स्वित्झर्लंडमधील सर्वात मोठी प्योर प्ले ई बाईक रिटेल साखळी एम-वे चालवत आहे. ज्यामध्ये महसूलाचा आकडा 753 कोटी रुपये आहे. कंपनी जवळ एक प्रसिद्ध स्विस मोबिलिटी ब्रँड पोर्टफोलियो आहे. ज्यामध्ये सिलो, सिंपेल, अलिग्रो आणि जेनिथ बाईक्सचा समावेश आहे. आपले मोठे प्रत्यक्ष जाळे आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या दोन ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि 31 स्टोअर्ससोबत जोडून ग्राहकांना वेगळा अनुभव देण्यास कंपनी प्रयत्न करत आहे.
10 वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांमध्ये गुंतवणूक
अधिग्रहणाची घोषणा करण्यात आल्यानंतर टीव्हीएस मोटारचे अध्यक्ष वेणु श्रीनिवास यांनी म्हटले आहे, की टीव्हीएस मोटरने कायम स्थिरता राखत विकास साधला असून 10 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये गुंतवणूक करत आहे. पर्यावरणपुरक योजनांसाठी जागतिक पातळीवर लक्ष दिले जात आहे.