शिवोलीत सर्वाधिक 13 तर सांखळीत 12 उमेदवार
प्रतिनिधी /पणजी
विधानसभेच्या येत्या दि. 14 रोजी होणाऱया निवडणुकीसाठी राज्यातील 40 सही मतदारसंघातून एकूण 301 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. काल सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत एकुण 31 मतदारांनी निवडणुकीतून माघार घेतली.
रिंगणात उतरलेल्या उमेदवारांमध्ये शिवोली मतदारसंघात सर्वाधिक 13 तर मुख्यमंत्र्यांच्या सांखळी मतदारसंघातून 12 उमेदवार नशीब आजमावणार आहेत. त्याखालोखाल कुंकळ्ळीत 10 उमेदवार आहेत तर सहा मतदारसंघातून प्रत्येकी 9 उमेदवार आहेत. दहा मतदारसंघात प्रत्येकी 8 आणि अकरा मतदारसंघात प्रत्येकी 7 उमेदवार आहेत. पाच मतदारसंघात प्रत्येकी 6 आणि पाच मतदारसंघातून प्रत्येकी 5 उमेदवार नशीब आजमावणार आहेत.
राज्य विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च 2022 रोजी संपुष्टात येत असल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने गोवा विधानसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार दि. 21 जानेवारीपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मार्गी लागली होती. त्यासाठी एकुण 587 इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर त्यातील 332 अर्ज ग्राह्य धरण्यात आले होते. त्यानंतर काल 31 जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार आता 40 मतदारसंघांसाठी 301 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. 10 मार्च रोजी राज्यात निवडणूक होणार आहे.