रताळी दर प्रतिक्विंटल 200 रुपयांनी कमी : भाजीपाला दरातही किंचित घट
वार्ताहर /अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा-बटाटय़ांचा भाव स्थिर राहिला. तर रताळय़ाचा भाव प्रतिक्विंटल दोनशे रुपयांनी कमी झाला आहे. भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या दरात किंचित घट झाली आहे. बेळगाव जवारी बटाटा आवक विक्रीसाठी येण्यास सुरुवात झाली आहे.
परराज्यातील इंदूर, आग्रा, तळेगाव आदी ठिकाणचा बटाटा विक्रीसाठी बेळगाव मार्केट यार्डमध्ये येत आहे. सध्या इंदूर, आग्रा, तळेगाव बटाटा देशामधील विविध बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी जात आहे. त्याचप्रमाणे बेळगाव एपीएमसीमध्ये इंदूर, आग्रा, बटाटा विक्रीसाठी दाखल होत आहे. मार्केट यार्डमधून गोवा, कारवार, कोकणपट्टा व बेळगाव परिसरामध्ये या बटाटय़ाला मागणी असते. सध्या बटाटा दर स्थिर आहे. बेळगाव तालुक्यातील रब्बी हंगामातील नवीन जवारी बटाटा आवक काढणीला प्रारंभ झाला आहे. तर लाल जमिनीमधील बटाटा बाजारात विक्रीसाठी येत आहे. याचा भाव सुद्धा स्थिर आहे.
कर्नाटकातील कांदा जवळपास संपत आला आहे. महाराष्ट्रातील कांदा आवक अधिक प्रमाणात येत आहे. हा कांदा-गोळी आणि मोठवड साईजमध्ये येत आहे. गोळा कांदा उत्पादनाचे प्रमाण घटले असल्याचे शेतकऱयांनी सांगितले. कारण कांदा मोठा (गोळा) होण्याच्या वेळीच पाऊस पडल्याने कांदा मोठा झाला नाही. यामुळे कांदा पिकाचे देखील नुकसान झाले असल्याची माहिती शेतकऱयांनी दिली.
रताळी आवक जवळपास संपत आली आहे. कर्नाटकसह इतर राज्यांमधील रताळी, पंजाब, मध्यप्रदेश, हरियाणा, दिल्ली या ठिकाणी जात आहेत. यामुळे बेळगाव रताळय़ाला मागणी कमी झाली आहे. यामुळे रताळय़ाचा दर प्रति क्विंटल 200 रुपयांनी कमी झाला आहे.
बेळगाव जिल्हय़ासह परराज्यातून भाजीपाला आवक अधिक प्रमाणात विक्रीसाठी भाजी मार्केटमध्ये येत आहे. यामुळे काही भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. तर काही भाजीपाल्यांचा दर कमी झाला आहे.
शनिवारी मार्केट यार्डमध्ये इंदूर बटाटय़ाच्या 12 ट्रक, तळेगाव बटाटा 1 ट्रक, आग्रा बटाटा दोन ट्रक आणि जवारी बटाटय़ाच्या 400 पिशव्या आवक तर रताळय़ाची 1600 पिशव्या आवक झाली होती. कर्नाटक कांद्याची दोन ट्रक, महाराष्ट्र कांद्याची 40 ट्रक आवक आणि पांढऱया कांद्याची शंभर पिशव्या आवक झाली होती. तालुक्याच्या पश्चिम भागातील बेळगुंदी, ढेकोळी, कुद्रेमनी, उचगाव, सोनोली, बेळगुंदी आदी गावातील नवीन जवारी बटाटा आवक विक्रीसाठी मार्केट यार्डमध्ये येत असल्याची माहिती अडत व्यापारी हेमंत पाटील यांनी दिली.
कर्नाटक कांदा प्रति क्विंटल
- गोळी 1000 ते 1500 रु.
- मीडियम 1500 ते 2000 रु.
- मोठवड 2100 ते 2400 रु.
- गोळा 2500 ते 2700 रु.
- पांढरा कांदा 2000 ते 2500 रु.
भाजीपाला प्रति दहा किलो
- ढबू मिरची 500 ते 600 रु.
- इंदोर ढबू मिरची 400 ते 500 रु.
- बिन्स…… 250 ते 350 रु.
- कारली…. 350 ते 400 रु.
- दोडकी…. 400 ते 550 रु.
- कोबी…… 160 ते 220 रु.
- इंग्लिश गाजर 300 ते 400 रु.
- भेंडी…….. 350 ते 450 रु.
- बिट…….. 180 ते 220 रु.
- जवारी काकडी… 280 ते 350 रु.
- पांढरी काकडी ….100 ते 180 रु.
- आले नवीन……….180 ते 200 रु.
- मटार…… 300 ते 500 रु.
- मिरची…. . 500 ते 600 रु.
- दुधी भोपळा डझन..60 ते 100 रु.
- टोमॅटो प्रति ट्रे 300 ते 500 रु.
- गोल भोपळा प्रतिक्विंटल…2400 ते 3000 रु.
भाजीपाला शेकडा भाव
- मेथी…….. 200 ते 500 रु.
- शेपू……… 350 ते 500 रु.
- पालक….. 150 ते 300 रु.
- कांदापात. 150 ते 300 रु.
- लाल भाजी…………….. 300 ते 400 रु.
- घटप्रभा कोथिंबीर ….400 ते 700 रु.
- बेळगाव कोथिंबीर….200 ते 400 रु.
महाराष्ट्र नवीन कांदा प्रति क्विंटल
- गोळी…… 1500 ते 2000 रु.
- मीडियम.. 2000 ते 2300 रु.
- मोठवड…. 2300 ते 2600 रु.
- गोळा…… 2700 ते 2900 रु.
जवारी बटाटा भाव प्रति क्विंटल
- गोळी…… ….400 ते 500 रु.
- मीडियम.. 1000 ते 1500 रु.
- मोठवड…. 1800 ते 2200 रु.
- इंदोर…… 1100 ते 1400 रु.
- आग्रा……. …800 ते 1100 रु.
- तळेगाव… ..900 ते 1200 रु.
- रताळी…. 1400 ते 2000 रु.