बांदा/प्रतिनिधी-
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इन्सुली गावात जल्लोष साजरा करण्यात आला. येथील गावठण येथे छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाला सहा पोलीस निरिक्षक शामराव काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. वेगवेगळी रंगभुषा, वेशभुषा, शाळकरी मुलांनी केलेले प्रबोधन व भव्य अशी मशाल रॅली व दुचाकीची रॅली ली या विविध कार्यक्रमांनी शिवजंयती निमित्त उत्साह दिसुन आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बांदा पोलीस सहा निरीक्षक शामराव काळे, सरपंच तात्या वेंगुर्लेकर, बांदा सरपंच अक्रम खान, माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे माजी सभापती मानसी धुरी, माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर गांवकर,उपसरपंच काका चराटकर, माजी उपसरपंच कृष्णा सावंत, ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर सोनाली मेस्त्री, शिवाजी चौक मंडळाचे अध्यक्ष दिलीप गावडे, मराठा समाज अध्यक्ष नितीन राऊळ,दिलीप कोठावळे, विनोद गांवकर, आजो परब, उल्लास गावडे, नाना पेडणेकर, तारामती नाईक, कृष्णा नाईक, दिनेश गावडे पोलीस पाटील जागृती गावडे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बांदा सरपंच अक्रम खान, सहा पोलीस निरिक्षक शामराव काळे, सहा शिक्षका विद्या पालव, तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर गांवकर, दिलीप कोठावळे यांचा सत्कार केला. यावेळी कु प्राची सावंत व जेष्ठ कृष्णा नाईक यांनी यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन सचिन पालव यांनी तर आभार रुपेश परब यांनी मानले