कीव्ह / वृत्तसंस्था
युद्धजन्य युक्रेनमध्ये बेळगाव जिल्हय़ातील दोन विद्यार्थिनी अडकल्या आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. विदेश मंत्रालयाच्या संपर्कासाठी कर्नाटकचे मंत्री प्रयत्नशील आहेत.
घटप्रभा (ता. गोकाक) येथील अमोघा चौगुला आणि कंकणवाडी (ता. रायबाग) येथील प्रिया निडगुंदी या दोघीही मेडिकलच्या विद्यार्थिनी असून त्या शुक्रवारी भारतात परतणार होत्या. बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ हे त्यांच्याशी संपर्क साधून आहेत. जिल्हय़ाचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनीही विद्यार्थिनींशी संपर्क साधला असून त्या सुखरुप असल्याचे सांगितले आहे. पालकमंत्र्यांनी मुलींच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना सुखरुप भारतात आणण्याचे आश्वासन दिले आहे. पालकमंत्री कारजोळ हे भारतीय दुतावासाच्याही संपर्कात असल्याचे सांगण्यात आले.