5000 एमएएच क्षमतेची मजबूत बॅटरी मिळणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रियलमी नारझो 50 या स्मार्टफोनचे भारतात सादरीकरण करण्यात आले आहे. यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 120झेडएचा रिप्रेश रेट असणारा डिस्प्ले आणि 5000 एमएएच बॅटरीच्या क्षमतेसोबत फास्ट चार्जिंगची सुविधाही मिळणार आहे.
रियलमी ही कंपनी स्मार्टफोन्सच्या बाजारात आपले वर्चस्व साकारत आहे. फोन नारझो 50 ए आणि नारझो 50 आय नंतर तिसऱया आवृत्तीचा स्मार्टफोन राहणार आहे. या मोबाईलची सुरुवातीची किमत 12,999 रुपये आहे. रियलमीच्या या स्मार्टफोनची टक्कर रेडमी, पोको आणि सॅमसंग बजेटमधल्या इतर स्मार्टफोनसोबत राहणार आहे.
विविध सुविधा
w 6.6 इंच आयपीएस एलसीडी स्क्रीन
w पंच होलसोबत सेल्फी कॅमेरा मिळणार
w पूर्ण एचडीमध्ये प्लस रिझोल्यूशन प्राप्त होणार
w फोन 20.9 आस्पेक्ट रेश्योसोबत येणार आहे
w गेमिंग आणि स्क्रॉलिंगची सोय
w 4जी कनेक्टिविटी पर्यायामध्ये 4जी वीओ एलटीइ, वायफाय 5, ब्लूटय़ूथ510 यासह अन्य फिचर्स