ऑनलाईन टीम/तरुण भारत
बॉलीवूडच्या प्रसिद्ध गाण्यांवर लिपसिंक करून व्हिडीओ बनवणारा टांझानियाचा सोशल मीडिया स्टार किली पॉल सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ मध्ये किली आणि त्याचा बहिण नीमाचा उल्लेख केला आहे. पंतप्रधान मोदींनी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर बोलताना त्यांनी भारतीय भाषांना लोकप्रिय करण्याचं आवाहन केलं. या संदर्भात त्यांनी किली आणि नीमा या प्रसिद्ध भावंडांचं उदाहरण दिलं. हे भाऊ-बहीण बॉलीवूडच्या गाण्यांवर थिरकत असतात. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत असतात. टांझानियामधील भारतीय दूतावासाने पॉल याला बोलावून त्याचा सन्मान केला. यानंतर आता
दरम्यान, बॉलीवूडच्या गाण्यांवर लिपसिंक करून टांझानियाचा सोशल मीडिया स्टार किली पॉल सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी टांझानियामधील भारतीय दूतावासाने पॉल याला बोलावून त्याचा सन्मान केला. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ मध्ये किली आणि त्याचा बहिण नीमाचा उल्लेख केला आहे.
भारतीय संस्कृती आणि आपल्या परंपरेबद्दल बोलताना, आज मला ‘मन की बात’मध्ये दोन लोकांशी तुमची ओळख करून द्यायची आहे असे पंतप्रधान म्हणाले. आजकाल टांझानियन भावंडं किली पॉल आणि तिची बहीण निमा यांची फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर खूप चर्चा आहे. आणि मला खात्री आहे, तुम्हीही त्यांच्याबद्दल ऐकले असेल. किली आणि नीमा यांना भारतीय संगीताची आवड आहे. यामुळेच ते खूप लोकप्रियही होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
टांझानियाचे हे किली पॉल, नीमा आहेत तरी कोण?
टांझानियामधील किली आणि नीमा ही भाऊ-बहीण जोडी आहे. ज्यांनी त्यांच्या ऑन-पॉइंट लिप-सिंक व्हिडिओ आणि ग्रूवी कोरिओग्राफीने नेटिझन्सची मने जिंकली आहेत. किलीने त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलमध्ये त्याचे वर्णन डान्सर आणि कॉन्टेंट क्रिएटर म्हणून केले आहे. किली पॉलचे इंस्टाग्रामवर 2.6 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याच वेळी 259 हजार लोक त्याची बहीण नीमा पॉलला फॉलो करतात.
किली पॉलच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलमध्ये त्याचे वर्णन “डान्सर आणि कंटेंट क्रिएटर” म्हणून केले जाते. त्याचे युट्युब चॅनेलसुद्धा आहे, जिथे त्याचे सर्व लोकप्रिय व्हिडिओ पोस्ट केले गेले आहेत. खास गोष्ट म्हणजे तो त्याच्या पारंपारिक पोशाखात व्हिडिओ पोस्ट करतो, त्यामुळे त्याची लोकप्रियता आणखीनच वाढत आहे. भारताव्यतिरिक्त तो इतर देशांमध्येही लोकप्रिय होत आहे.