जपानच्या किलिंग स्टोनमधील प्रकार
जपानमध्ये सध्या क्रूर प्रेताची चर्चा आहे. सुमारे 1 हजार वर्षांपूर्वी एका दगडात कैद ‘क्रूर पेत’ आता मुक्त झाल्याचे काही लोकांचे मानणे आहे. या दगडाला ‘किलिंग स्टोन’ या नावाने ओळखले जात होते, आता हा दगड दोन तुकडय़ांमध्ये तुटला आहे. या दगडात कैद एक ‘वाईट आत्मा’ मुक्त झाला असल्याचे बोलले जात आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवणाऱयांसाठी ही एक ‘मोठी चिंताजनक’ बाब आहे.
जो या दगडानजीक जातो, त्याचा मृत्यू होत असल्याचे जपानमध्ये बोलले जते. पौराणिक कथांनुसार या ज्वालामुखीय टेकडीचे अधिकृत नाव सेशो-सेकी असून त्यावर ‘टॅमोमो-नो-मै’चे घर होते.
या सैतानाने एका सुंदर महिलेचे रुप धारण केले होते, जी 1107-1123 पर्यंत जपानचे शासक राहिलेले सम्राट टोबा यांना मारण्याच्या कटात सामील होती असे मानले जाते. ही टेकडी तोचिगीच्या पर्वतीय क्षेत्रात टोकियोनजीक आहे. तसेही हा दगड पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्र होता, परंतु आता पर्यटक येथे जाण्यास घाबरत आहेत. पुन्हा एकदा विध्वंस घडविण्यासाठी या वाईट आत्म्याला मुक्त करण्यात आल्याचे काही लोक म्हणत आहेत.
हा दगड दोन वर्षांपूर्वीच तुटण्यास सुरुवात झाली होती. पावसाचे पाणी भेगांमध्ये शिरल्याने हा दगड दोन हिस्स्यांमध्ये विभागला गेला आहे. तुटलेल्या हिस्स्यासोबत काय करावे याचा विचार अधिकारी करत आहेत.