वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया
एटीपी टूरवरील येथे सुरू झालेल्या इंडियन वेल्स खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ब्रिटनचा माजी टॉप सीडेड टेनिसपटू तसेच दोनवेळा विम्बल्डनचे जेतेपद मिळविणाऱया अँडी मरेने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील 700 वा एकेरी सामना जिंकला. या स्पर्धेत महिला विभागात अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम विजेती इमा रेडुकेनुने तिसऱया फेरीत प्रवेश मिळविला.
पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात अँडी मरेने जपानच्या डॅनियलचा 1-6, 6-2, 6-4 असा पराभव करत विजयी सलामी दिली. मरेच्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील हा 700 वा विजयी सामना आहे. मरेने आतापर्यंत तीन ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहे पण, 34 वर्षीय मरेला अद्याप एकदाही इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकता आलेली नाही.
महिला एकेरीच्या दुसऱया फेरीतील सामन्यात अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम विजेती इमा रेडुकेनूने कॅरोलिनी गार्सियाचा 6-1, 3-6, 6-1 असा पराभव करत तिसऱया फेरीत स्थान मिळविले आहे. तिचा तिसऱया फेरीतील सामना क्रोएशियाच्या मार्टिकशी होणार आहे.