राजधानीला दररोज विमानफेरी सुरू होणार
प्रतिनिधी /बेळगाव
दिल्ली-बेळगाव-दिल्ली ही विमानफेरी दि. 27 मार्चपासून आता दररोज असणार आहे. यासाठी स्पाईसजेट कंपनीने वेळापत्रकात बदल केला आहे. नव्या वेळापत्रकानुसार स्पाईसजेटच्या दिल्ली, हैदराबाद व मुंबई फेऱया सुरू होणार आहेत. देशाच्या राजधानीला यापुढे दररोज विमानफेरी सुरू असणार आहे. प्रवाशांनी आतापासूनच बुकिंग सुरू केले आहे.
सकाळी 6.05 वा. दिल्ली येथून उड्डाण घेतलेले विमान सकाळी 8.45 वा. बेळगाव विमानतळावर पोहोचणार आहे. सकाळी 9.15 वा. बेळगाव विमानतळावरून निघालेले विमान सकाळी 11.45 वा. दिल्लीला पोहोचणार आहे. सकाळी 9.50 वा. हैदराबाद येथून निघालेले विमान सकाळी 11.05 वा. बेळगावला पोहोचणार आहे. सकाळी 11.25 वा. बेळगाव विमानतळावरून ते मुंबईला जाण्यास निघेल आणि दु. 12.45 वा. मुंबई विमानतळावर पोहोचेल. दु. 1.15 वा. मुंबई येथून निघालेले विमान दुपारी 2.25 वा. बेळगावला पोहोचून दु. 2.45 वा. बेळगाव विमानतळावरून उड्डाण करून सायं. 4.10 वा. हैदराबाद विमानतळावर पोहोचेल.
विमानांच्या संख्येत होणार वाढ
सध्या बेळगावमधून दिल्ली, बेंगळूर, हैदराबाद, मुंबई, पुणे, इंदूर, जोधपूर, तिरुपती, अहमदाबाद या शहरांना विमानसेवा सुरू आहे. आता दररोज दिल्लीला बोईंग विमान ये-जा करणार असल्यामुळे प्रवासी संख्येसह विमानाच्या संख्येतही वाढ होणार आहे. सध्या 6 ते 7 विमाने बेळगावला येत असून दिल्ली विमानफेरीमुळे वाढ होणार आहे.