15 ऑगस्टपासून या सेवेचा वापर सुरु होणार असल्याची माहिती
नवी दिल्ली : सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (सी-डॉक) यांच्यासोबत टीसीएसच्या नेतृत्वासोबत हातमिळवणी केली असून यांनी स्वदेशी 4जी आणि 5जी नेटवर्क तंत्रज्ञान विकसित केला आहे. याचा वापर हा 15 ऑगस्टपर्यंत बीएसएनएलच्या नेटवर्कमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱयांनी दिली आहे.
‘कन्वर्झेस इंडिया कार्यक्रम’अंतर्गत स्वदेशी स्वरुपात नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी जवळपास 30 कोटीडॉलर खर्च करण्यात येत असल्याचे सी-डॉकचे कार्यकारी संचालक राजकुमार उपाध्याय यांनी सांगितले आहे.
‘मला आपणास सांगण्यास आनंद होत आहे, की लवकरच आम्ही चांगली बातमी सांगणार आहे. ती म्हणजे लवकरच बीएसएनएलच्या नेटवर्कमध्ये सदरच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. याचा प्रारंभ आम्ही स्वातंत्र्यदिनापासून करणार असल्याचेही उपाध्याय यांनी स्पष्ट केले आहे.’
बीएसएनएलसाठी 45,000 कोटीची तरतूद
बीएसएनएल 15 ऑगस्टपर्यंत 4 जी सेवा सुरु करण्यात येणार आहे. यासाठी बीएसएनएलला 45,000 केटी रुपयाची तरतूद केली असल्याचे बीएसएनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पीके पुरवार यांनी नमूद केले आहे.