शाहुवाडी प्रतिनिधी
करंजोशी ता.शाहूवाडी येथील म्हसोबा मंदिराजवळ असणा-या बॉक्साईट डेपोवर मशिनरिवर लोडर असणा-या अक्षय गांवकर वय २९, रा. रामनगर, ता. जोयडा, जि. कारवार याचा शिवीगाळ केल्याच्या कारणावरून डोक्यात लोखंडी पाईप घालून खून केल्याची घटना घडली.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, मृत अक्षय गांवकर आणि आरोपी सहदेव यादव हे दोघे भुमि रिसोर्जेस प्रायव्हेट लि. या कंपनीकडे भाडेतत्वार असलेल्या मशिनरीवर ऑपरेटर म्हणून कामाला होते. शुक्रवारी रात्री अक्षय गावकर याने सहदेव यादव यास आई व बहिणीवरून अश्लील शिवीगाळ केली. त्याचा राग मनात धरून सहदेव यादव याने अक्षय गावकर याच्या डोक्यात आणि कपाळावर लोखंडी पाईप घालून ठार मारले. हि घटना शुक्रवारी दि.२५ मार्च रोजी रात्री ११.३० वा.घडली यानंतर कंपनीचे सुपरवायझर बसवराज कल्लापा पाटील, खानापुर, बेळगांव यांनी फिर्याद दिली आहे. मृत अक्षय गांवकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मलकापूर ग्रामीण रूग्णालयात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पोनि. विजय पाटील करित आहेत. दरम्यान आरोपीला त्या परिसरातच पोलिसांनी अटक केली.