पणजी शिमगोत्सव समितीतर्फे स्पर्धांचे निकाल जाहीर
वार्ताहर /पणजी
पणजी शिमगोत्सव समितीतर्फे शनिवारी झालेल्या चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य व वेशभूषा स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. महालक्ष्मी नागरिक समिती बांदोडाच्या चित्ररथाला 60000 रुपयाचे प्रथम, सुयोग शिमगोत्सव मंडळ आडपई-आगापूरच्या रोमट पथकाला 35000 रुपयाचे प्रथम व सरस्वती कला मंडळ केळबायच्या लोकनृत्य पथकाला लोकनृत्याचे 20000 रुपयाचे प्रथम अशी बक्षिसे जाहीर झाली आहेत.
चित्ररथ स्पर्धा ः द्वितीय-साई बाल मंडळ दुर्भाट (50,000 रु.), तृतीय-बाल गोपाल कला सांस्कृतिक मंडळ, चिंबल (40000रु.), उत्तेजनार्थ 1) दामोदर महालक्ष्मी कला संघ, उंडीर-बांदोडा (30,000रु.), 2) धाडेश्वर स्पोर्ट्स कल्चरल क्लब, नेरुल (20,000रु.), 3) गजानन कला मंडळ, कपिलेश्वरी (15,000रु.), 4) ब्रम्हेश्वर युवक संघ,आखाडा (12,000), 5) युनायटेड बॉयज, कुर्टी-फोंडा(10,000रु.), प्रत्येकी 6000 रुपयाची उत्तेजनार्थ -सरस्वती युथ क्लब, डाग-फोंडा, रायेश्वर युवक मंडळ, राय-मडगाव, महालक्ष्मी क्रिएशन, काकोडा- कुडचडे, सिद्धेश्वर कला मंडळ बसतोडा, गजानन क्रिएटिव्ह बॉईज देवतेवाडा युवक मंडळ कुडतरी,तालिगाव युथ ताळगाव,सातेरी युवक संघ मेरशी व शिवा बॉईज मुरलीधर युवक संघ कळंगूट.
रोमटामेळ स्पर्धा ः द्वितीय-सावर्डे शिगमोत्सव मंडळ (25,000रु.), तृतीय-कुडचडे काकोडा शिगमोत्सव समिती (15,000रु.), चौथे-स्वरसाई शिगमोत्सव मंडळ, खोर्ली-म्हापसा (10,000रु.), पाचवे-बार्देस शिगमोत्सव समिती (8000रु.) उत्तेजनार्थ प्रत्येकी 7000 रुपयाची बक्षिसे -डोंगरी शिगमोत्सव मंडळ, पाईकदेव शिगमोत्सव समिती सांगे, शांतादुर्गा शिगमोत्सव समिती कळंगूट.
लोकनृत्य स्पर्धा ः द्वितीय-सावईवेरेचो सख्याहरी (15,000रु.), तृतीय-श्री. गुरू कला मंडळ पिसगाळ- प्रियोळ (10,000रु.), उत्तेजनार्थ (प्रत्येकी 5,000रु.)-यशलीला कल्चरल असोसिएशन, झरीवाडा- प्रियोळ, फिटनेस फर्स्ट, वास्को व नवदुर्गा सांस्कृतिक मंडळ, मडकई.
वेशभूषा स्पर्धा ः मोठा गट- प्रथम- रामचंद्र गवाणकर (डॉ. आंबेडकर), द्वितीय-अनुष्का धर्मानंद मोरजकर (विष्णूरूप), तृतीय-योगराज गवाणकर (विठ्ठलमूर्ती), उत्तेजनार्थ-योगानंद रामनाथ पालकर (विष्णूदेव), शिवलिंग रमेश नाईक (राखणदार), सिद्धेश मगनलाल मराठे (शिवा), रामा खांडेपारकर (साईबाबा), अनुपचंद्र मडकईकर (योगी आदिनाथ), तेजा जयंत नाईक (राक्षस), धर्मा नाईक (संत तुकाराम), अनिशकुमार पोके (ज्योतिबा फुले), संदीप मयेकर (गणपती), मंथन गावस (श्रीकृष्ण), शिवा नाईक (जांबु वंत).
लहान गट ः प्रथम-वीर जनार्दन नाईक (वासुदेव), द्वितीय-आर्या सहकारी (मल्टी टास्किंग वूमन), तृतीय-पलक प्रशांत पांगम (दुर्गा), श्रावणी पुष्पक सातर्डेकर (झांशीची राणी), निष्कृती दयानंद भोसले (संत मिराबाई), अनैशा गौतम पांगम (मेनका), रेयंश लक्ष्मण कोळी (वामन अवतार), जीविका जयराम आर्लेकर (राधा), रितेश लक्ष्मण कोळी (जय मल्हार), प्रांजल प्रविण सातार्डेकर (बाल शिवाजी), शिवज्ञा किर्लोस्कर (हनुमान) रिधांत गौरेश रेडकर (हनुमान), साक्ष शैलेश मोरजकर (मल्हार).