डिस्प्ले सोयीनुसार वापरण्याची सुविधा मिळणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शाओमीचा फोल्डेबल स्मार्टफोन अपडेट मॉडेल मोठय़ा स्क्रीनसोबत सादर होणार आहे. शाओमी मिक्स फोल्ड-2 हे मॉडेल सादर करण्यात येणार असून यामध्ये 6.5 इंच आकाराचा डिस्प्ले मिळणार आहे, जो अनफोल्ड झाल्यानंतर 8 इंचामध्ये बदलणार आहे.
नव्या फोल्डेबलमध्ये 8 इंच डिस्प्ले
टिप्सटर डिजिटल चॅट स्टेशन यांनी यावेळी दावा केला आहे, की शाओमी एमआय मिक्स फोल्ड2 स्मार्टफोनमध्ये डोळय़ांना इजा कमी करण्यासाठी डीसी डिमिंग फिचरसह 120 एचझेड रिप्रेश रेट असणारा डिस्प्ले दिला आहे. यासोबतच अन्य सुविधाही उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
चालू वर्षातच येणार बाजारात
टिप्सटरच्या माहितीनुसार मिक्स फोल्ड-2 फोल्डेबल फोनला क्वालकॉम स्नॅपड्रगन 8 वी आवृत्ती 1 प्लस प्रोसेसरसोबत मिळणार आहे. यामध्ये चिपसेट मॉडेलनंबर एसएम8475 आहे. हा चिपसेट टीएसएमसीसोबत 4एनएम मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्मवर आधारीत राहणार असल्याची माहिती आहे. शाओमीने सध्या मिक्स फोल्डला इंडियामध्ये सादर केलेले नसून या सादरीकरणानंतर ग्राहकांच्या पसंतीस हे मॉडेल उतरणार असल्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.