अमेरिका-जर्मनीचे अधिकारी भारतात, ब्रिटन-रशियाचे मंत्री आज येणार
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ब्रिटन, जर्मनी, अमेरिका आणि रशिया या चार प्रमुख देशांचे मंत्री एकाच वेळी भारताच्या दौऱयावर असल्याची अनोखी घटना सध्या घडत आहे. जर्मनीच्या संरक्षण उपमंत्र्याचा दर्जा असणारे जेन्स प्लाँटर बुधवारीच भारतात आले आहेत. तर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार दलीप सिंगही भारतात आले आहेत.
रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्जेई लाव्हरोव्ह गुरुवारी भारतात येत आहेत. तर याच दिवशी ब्रिटनच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री लिझ ट्रस हे दोन महत्वाचे नेते गुरुवारी भारतात पोहचत आहेत. तीनच दिवसांपूर्वी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे भारतात येऊन गेले आहेत. युपेन युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारतात विदेशी महनीयांचे होत असून राजकीय हालचालींना गती आली आहे.
भारत आणि युक्रेन युद्धाचा थेट संबंध नाही. तसेच भारताने या संदर्भात पाश्चिमात्य देश किवा रशिया यांच्यापैकी एकाची बाजू घेणे टाळले आहे. संयुक्त राष्ट्रसंघ किंवा सुरक्षा परिषदेत युपेन युद्धासंबंधी मांडण्यात आलेल्या कोणत्याही प्रस्तावरील मतदानात भारताने भाग घेतलेला नाही. तरीही भारतात याच युद्धाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मोठय़ा देशांचे नेते येत आहेत.
दलीप सिंग यांची चर्चा
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार दलीप सिंग यांनी भारताच्या अधिकाऱयांशी चर्चा केली. भारताने या युद्धात युक्रेनच्या बाजूने उभे राहावे, असा अमेरिकेचा प्रारंभापासून आग्रह आहे. रशियानेही भारताला आपल्या पक्षधर होण्यासाठी गळ घातली आहे. भारताने मात्र अद्यापतरी समान अंतर राखण्याचे धोरण कायम ठेवले आहे. जर्मनीचे अधिकारी प्लाँटर यांनीही भारतीय अधिकाऱयांशी बोलणी केली असून भारताने त्यांना आपली भूमिका सांगितली.
या अधिकाऱयांशी नेमके बोलणे काय झाले याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, युक्रेनचे युद्ध हा महत्वाचा विषय त्यांच्या चर्चेत होता, हे उघड असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले. दोन्ही बाजूच्या समर्थकांना भारत आपल्या बाजूला हवा आहे, यावरुन भारताचे आंतरराष्ट्रीय महत्व अधोरेखित होते. तरी भारत कोणत्याही एका बाजूला दुखवू शकत नाही, हे ही स्पष्ट आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री तसेच ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री भारताची युपेनप्रमाणेच इतर महत्वाच्या विषयांवरही विचारविमर्श करणार आहेत. जागतिक स्थिती, युक्रेन युद्धाचे परिणाम, परस्पर संबंध इत्यादी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे